पंढरपूर - गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले व मोहीते पाटील गटाचे कट्टर समर्थक गुलाब मुलाणी यांनी राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत व मा.खा. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या उपस्थितीत  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी त्यांचे स्वागत केले. दिपक वाडदेकर यांनी यासाठी मोलाची भुमिका पार पाडली.या पक्ष प्रवेशानंतर गुलाब मुलाणी यांची भारतीय जनता पार्टी पंढरपूर ग्रामिण अल्पसंख्याक मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.    
      या पक्ष प्रवेशानंतर बोलताना गुलाब मुलाणी म्हणाले की,आमचे नेते विजयसिंह मोहीते पाटील यांनी सदैव अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची सन्मान देण्याची भुमिका पार पाडली आहे.तर आ.प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींचा राजकिय सन्मान करण्याबरोबरच अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.अनेकांच्या प्रपंचासाठी आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.त्यामुळेच आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहोत.
 
Top