पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून आघाडीतर्फे विद्यमान काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाने उशिरा यादी जाहीर केली त्या यादीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवाजी काळुंगे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे आघाडीतील उमेदवारांचा घोळ समोर आला.काँग्रेसतर्फे शिवाजी काळुंगे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता . यावेळेस पक्षाने मला अधिकृत उमेदवार जाहीर केले त्यामुळे मी यंदा ही निवडणूक लढविणारच अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

गुरुवारी भारत भालके आणि शिवाजी काळुंगे यांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केले.
 
Top