खर्डी,(अमोल कुलकर्णी)- मनाला आल्हाददायक वाटणारी रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी हौशी पर्यटक सातारा जिल्ह्यातील कास पठाराला भेट देतात.पण निसर्गातील फुलांमध्ये जशी विविधता रंग, आकार, गंध यामध्ये एवढा "हटके" पणा कोण निर्माण करतो हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय रहात नाही.


सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पश्चिमेला असणारे उंबरगाव एक छोटेसे गाव.या गावातून तिसंगीकडे जाणाऱ्या मार्गावर वनपरिक्षेत्र आहे. या वना जवळील माळरानावर यावर्षी बऱ्यापैकी उशिराने हजेरी लावणाऱ्या परतीच्या पावसाने मात्र नानाविध फुलांची मुक्तपणाने उधळण केली आहे.


अठरा ते बावीस प्रकारची फुले या ठिकाणी पहावयास मिळत आहेत.फुले,पक्षी निरीक्षण, छायाचित्रण करणाऱ्या हौशी वनप्रेमीना हा माळ आज खुणावू लागला आहे.या फुलांवर विविध रंगी फुलपाखरे, नानाविध पक्षीही दिसून येत आहेत.एकूणच आट्यापाट्या स्पर्धासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उंबरगाव या गावाची आता नव्याने ओळख निर्माण होईल अशी फुले या माळावर फुलली आहेत.


(छायाचित्रे - अमोल कुलकर्णी ,खर्डी)
 
Top