पदयात्रेला पंढरपूरच्या युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या प्राचारार्थ पंढरपूर शहरात पदयात्रा काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून या पदयात्रेस सुरू करण्यात आली. ही पदयात्रा स्टेशन रोड मार्गे निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पुढे सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौक, नाथ चौक, तांबडा मारुती, महाव्दार, कालिकादेवी चौक, काळा मारुती, चौपाळा या मार्गावरून हलगीच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली.याप्रसंगी राजाराम सावंत, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, दिलीप देवकुळे, शैलेश घोगरदरे,सागर कदम, वसंत गरंडे, अविनाश चव्हाण, बापु मस्के, युवराज मुचलंबे, नाना घायाळ, महादेव कोरे, विठ्ठल काळुंगे, दत्तात्रय गायकवाड, डॉ. रविराज गायकवाड,रजाकभाई मुजावर, परमेश्वर घुले, संजय सुर्यवंशी यांचेसह अनेकजण कार्यकर्ते व महिला भगिनी सहभागी झाले होते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आजवर उभा राहू शकली नाही. याबाबत बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पंढरपूरात स्थापना करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.देशाच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला येतात. शेगाव, नांदेड, शिर्डीचा विकास झाला परंतु पंढरपूरचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. १९९५ पासून ते आजतागायत चार विकास आराखडे तयार केले आणि घोषणाही केल्या. विकास आराखड्यांची घोषणा होऊनही पंढरपूरच्या विकासाला गती मिळालेली नाही.
पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी हाताचा पंजा क्रमांक एक असणाऱ्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी यावेळी केले.

या पदयात्रेत प्रा. काळुंगे यांनी मतदारांशी भेटून सवांद साधला. यावेळी पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते.
 
Top