सोलापूर - जिल्हा मतदान जनजागृती समिती व जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा परिषद व सोलापूर महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यामाने आज मतदान जनजागृती निमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.२० वाजता लोक व विद्यार्थी पडत्या पावसात मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा येथून या सायकल रॅलीचा शुभारंभ केंद्रीय निवडणूक निरिक्षक विभू राज यांच्या हस्ते करण्यात आला. हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करणेच आला. सोलापूर शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सर व महानगर पालिका आयुक्त दीपक तावरे सपत्नीक सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ सर, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार सर, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , शिक्षणाधिकारी संजय राठोड , महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, स्वीप समिती सदस्य अविनाश गोडसे, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, विस्तार अधिकारी अशोक भांजे, क्रिडा शिक्षक व समन्वयक अनिल पाटील,महापालिका शिक्षण मंडळांचे प्रशासन अधिकारी शेख प्रमुख उपस्थित होते. 

*मतदानासाठी वेळ काढा...आपली जबाबदारी पार पाडा..._* *मतदान करा लोकशाही बळकट करा* अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हातात मतदान जनजागृती चे संदेश असलेले फलक घेऊन हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहानास आज पावसाच्या सुरू अंगावर घेत विद्यार्थी व नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते. 

मानवी साखळीसाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सेविका, विविध विभागाचे कर्मचारी तसेच लायन्स व रोटरी क्लब तो पदाधिकारी, नेचर क्लब, इको फ्रेन्डली क्लब, सर फाऊंडेशन, विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 

*लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा*- *पोलिस आयुक्त अंकुश शिंदे*

सोलापूर शहर व जिल्हयात मतदान करणेसाठी लोकांनी घराबाहेर येऊन मतदान करावे. आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाही बळकट करावी. असे आवाहन केले. पर्यावरण व मतदान जनजागृती साठी सायकल रॅलीसाठी सपत्नीक सहभागी असल्याचे आयुक्त शिंदे यांनी आवर्जून सांगितले. 

*हक्काचे मत द्या*- *आयुक्त दीपक तावरे*
सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी नागरिकांनी हक्काचे मतदान करावे. मतदान हा आपला अधिकार आहे. ते बजावावा.निपक्ष व निर्भय पणे मतदान करा असे आवाहन केले.
   लायन्स क्लब ऑफ सोलापूर, मेन अध्यक्ष वीरेंद्र हिंगमीरे,लायन्स क्लब ऑफ सोलापूर, सेंट्रल अध्यक्ष राजू चौधरी,लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिड टाऊन,अध्यक्ष महेश नळे , सिटी क्लब चे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, लायन्स क्लब ऑफ सोलापूर, मेट्रो  अध्यक्ष अशोक भांजे-लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्वीन सिटी, अध्यक्ष विश्वनाथ स्वामी, लायन्स क्लब ऑफ सोलापूर, रॉयल अध्यक्ष उर्मिला खेरोडकर,लायन्स क्लब ऑफ सोलापूर, क्लासिक, अध्यक्ष असिफ ईकबाल शेख, उपस्थित होते.

*मतदानासाठी वेळ काढा*- *सिईओ प्रकाश वायचळ*

सोलापूर शहर व जिल्हयात येत्या २१ आँक्टोबर रोजी होणारे विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी वेळ काढून मतदान करा. आपला हक्क बजावा. लोकशाही रूजविणेसाठी मतदान करा. देश बळकट करा. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा असे आवाहन केले.  

*मतदान जनजागृती प्रतिज्ञा अन् रॅलीची सांगता...!!*

सायकल रॅली संपल्या नंतर चार हुतात्मा पुतळा येथे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी मतदान जनजागृती ची शपथ दिली. हजारो विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी व विविध संस्थाचे प्रतिनिधी यांनी शपथ घेतली. 

*केंद्रीय निवडणूक निरीक्षकाकडून कौतुक*

*विधानसभा निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक विभू राज यांनी सोलापूरकरांचा उत्साह पाहून कौतुक केले. मतदान जनजागृतीसाठी एका हातात छत्री तर दुसरे हातात मतदान जनजागृती फलक तर विद्यार्थींनींची सायकलवरील उपस्थिती पाहून कौतुक केले. 
 
Top