*स्वानंद:*

स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती...
त्याबद्दल आचार्य अत्र्यांच्या "मराठा"  या वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची...

एकदा आचार्य अत्र्यांनी श्री.गिरी , सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला...
आणि त्याखाली हेडिंग दिले 
*''गिरी आणि त्यांची 'काम' गिरी''


एकदा कुटुंब नियोजनाच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमात आचार्य अत्रे वक्ते म्हणुन आले होते आणि अटलबिहारी वाजपेयीजी आणि व्ही. व्ही. गिरी प्रमुख पाहुणे म्हणून होते. 
आचार्य अत्र्यांनी सुरुवातीलाच सांगितले की,
 "आजच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यातील एकाला कुटुंब म्हणजे काय हे माहिती नाही...
तर दुसऱ्याला नियोजन म्हणजे काय ते माहिती नाही..."


*आचार्य अत्रे यांचे आजचे जयंती निम्मित विनम्र अभिवादन*

संकलन- अविनाश कुटे पाटील,नेवासा
 
Top