प्रकाशक - व्यापारी मित्र पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ,पुणे 


 पुणे - देशाची शिक्षण प्रणाली कितीही प्रगत असली तरी त्यामध्ये नागरिकांना अर्थसाक्षर व कर साक्षर बनवण्याची क्षमता नसते. त्यामुळे बहुतांशी लोकांना यासाठी सीए व कर सल्लागार यांच्यावर अवलंबून राहावे लागते. लोकांची ही निकड लक्षात घेऊन व्यापारी मित्राने स्वातंत्र्योत्तर काळापासून कर कायद्याबाबत जनजागृती करण्याची चळवळ हाती घेतली आहे. सात दशकांपासून हे प्रबोधन कार्य आजही सातत्याने अव्याहतपणे जोमाने सुरू आहे .व्यापारी मित्र या मासिकाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर कायद्याच्या क्लिस्ट तरतुदी अत्यंत सोप्या मराठी भाषेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले आहेत व्यापारी मित्र मासिकाशिवाय आयकर मार्गदर्शिका व जीएसटी मार्गदर्शिका ही वेळोवेळी प्रकाशित केलेल्या आहेत. व्यापारी मित्रची आयकर मार्गदर्शक दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे .यामध्ये वित्त विधेयक २०१९ आयकर कायद्यात झालेले बदल समाविष्ट आहेत .मराठी भाषेतील अशा प्रकारची पहिलीच मार्गदर्शक असल्याने कर विषयक जाणीव असलेल्या सुज्ञ वाचकांमध्ये लोकप्रिय आहे .उपरोक्त आकारणी वर्षासाठी व्यक्ती, भागीदारी संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, व्यक्ती समूह व कंपन्या यांना किती कर भरावा लागेल यांचे तक्ते यामध्ये दिलेले आहेत. मार्गदर्शकेमध्ये ठिकठिकाणी न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. बेनामी मालमत्ते संबंधीची माहितीही उद्बोधक प्रकारे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. 
मार्गदर्शकीमध्ये काय वाचाल 
या मार्गदर्शकेची मांडणी ३४ प्रकारांमध्ये केली असून त्यामध्ये व्याख्या ,पगार ,घरापासून व व्यवसाय-धंदा पासून मिळणारे उत्पन्न, भांडवली स्वरूपाचा नफा, उत्पन्नातून मिळणाऱ्या विविध रकमा, मुळात कापला जाणारा कर ,मुळातून कर वसुली, आगाऊ आयकर पत्रक तरतुदी ,आकारणी कार्यपद्धती, व्याज, दंड, फौजदारी गुन्हे व शिक्षा, रिफंड , भागीदारी संबंधी तरतुदी, धाडी जप्ती संबंधी व अन्य महत्त्वाच्या तरतुदी बद्दल महत्त्वाची कलमाप्रमाणे २०१९ चा अर्थसंकल्प यांच्याबद्दल माहिती दिली आहे. तसेच आकारणी वर्ष २०१९-२० साठी आयकर आकारणी, वर्ष २०२०-२१ साठी आगाऊ आयकर तक्ते (रेडीरेकनर) ही दिले आहेत. मार्गदर्शकेमध्ये मुंबई दुकाने व आस्थापना कायदा अधिनियम २०१७ ,महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे सात कामगार कायदे आणि अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ ची माहिती देण्यात आलेली आहे. या मार्गदर्शकेची भाषाशैली सुलभ ओघवती व प्रच्छन्न झालेली आहे. 
या पुस्तकाची पाने ४१२ असून किंमत रुपये ९००/- आहे. त्यासाठी संपर्क नंबर ९४२१८८०२९०
 
Top