करमाळा- माढा विधानसभा मतदार संघातील  निवडणूक प्रचाराअंतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर व तालुका भाजपा यांच्या वतीने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचीच्या अधिकृत उमेदवार रश्मी दिदी बागल यांना विजयी करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. 


याप्रसंगी बोलताना रश्मी दिदी म्हणाल्या कि, करमाळा तालुका भाजपा कार्यकारणीने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. हा मेळावा आम्ही बोलवण्या पेक्षा आपण बोलवलात याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहे. आपल्या सर्वांना असेच एकजुटीने काम करून महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे.आपल्या सर्वांना सोबत घेऊनच काम करणार आहोत. यापुढेही आपण खांद्याला खांदा लावून सोबतीने काम करू. महायुतीमध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाईल. कोणालाही न डावलता विकासाला सर्वांनी हातभार लावूयात. आज काहीही नियोजन नसतानाही आपण सर्व जण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात हे तुमच आमच्यावर असलेल प्रेम पाहून आनंद होत आहे. येणाऱ्या २१ तारखेला धनुष्यबाणाला मतदान करून आपण आम्हाला नक्कीच विजयी कराल असा आम्हाला विश्वास आहे. 

या विजयी संकल्प मेळाव्याच्या प्रसंगी शिवाजीराव सावंत (जिल्हा समन्वयक शिवसेना), संभाजीराजे शिंदे( जिल्हा अध्यक्ष, शिवसेना ), दिग्विजय भैय्या बागल (युवा नेते शिवसेना ), गणेश चिवटे( तालुका अध्यक्ष,भाजपा ),विलास घुमरे, विठ्ठलराव बनगे, किरण बोकन (माजी नगरसेवक),भगवान गिरी,मोहन शिंदे,दिपक चव्हाण,गिता कापडी, अमोल पवार आदि उपस्थित होते.
 
Top