माटुंगा (मुंबई) येथे श्री शक्तीदर्शन योगाश्रमाच्या वतीने २९ सप्टेंबरला भारतीय गायींचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या ‘धेनू ध्यान’ संमेलनाचे आयोजन


मुंबई, प्रतिनिधी – भारतीय गायींचे संवर्धन व्हावे आणि त्यांचे श्रेष्ठत्व कळावे, यासाठी श्री शक्तीदर्शन योगाश्रमाच्या वतीने २९ सप्टेंबर या दिवशी ‘धेनू ध्यान’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील भाऊदाजी रोड येथील म्हैसूर असोसिएशन ऑडिटोरिअम येथे सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत हे संमेलन होणार आहे. श्री शक्तीदर्शन योगाश्रमाचे संस्थापक प.पू. योगाचार्य देवबाबा यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या उपस्थितीत हे संमेलन होणार आहे. या संमेलनात प.पू. योगाचार्य देवबाबा भारतीय गायींचे महत्त्व आणि संवर्धन यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनाला ‘रामदेव ग्रुप’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, तसेच ‘अहिंसाधाम ट्रस्ट’चे विश्‍वस्त महेंद्र संगोई हे मुख्य वक्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. आरोग्यतज्ञ उत्तम महेश्‍वरी, मिडास हायजिन प्राय. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक स्वदेश कपूर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार पंडित ओंकार गुलवडी , समस्त महाजन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश शहा, माजी महापौर सौ. शुभा राऊळ, मुंबई येथील कन्नड कला केंद्राचे अध्यक्ष बैलुर बालचंद्र राव, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ.उदय धुरी, बाँम्बे बन्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री. श्याम शेट्टी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनाविषयीच्या अधिक माहितीसाठी ९९००४११०७९, ९३२२१९०९८०, ९००४०६७८९७ या भ्रमणभाष क्रमांकांवर संपर्क करावा. सर्व संस्कृती आणि गोप्रेमी यांनी या संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शक्तीदर्शन योगाश्रमाद्वारे करण्यात आले आहे.
 
Top