अकलूज - भगवान महावीर २५०० वा मुक्ति महोत्सव मंडळ, डोंबिवली (पूर्व) या संस्थेतर्फे भगवान् महावीर पुरस्कार" आयुष्यातील कोणत्याही खडतर अडचणींची पर्वा न करता आत्मोन्नती, जैन समाजसेवेत रत असलेले,अकलूज, जि. सोलापूर येथील हिरालाल (बाबूभाई) माणिकलाल गांधी,यांना प.पू.स्वस्तिश्री भानुकिर्ती भट्टारक स्वामीजी ,जैन मठ ,कंबदल्ली, कर्नाटक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे .
  हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २२/९/२०१९ सकाळी १० वाजता आदित्य सभागृह,आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे होणार असून त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भगवान महावीर २५०० वा मुक्ति महोत्सव मंडळ, डोंबिवली (पूर्व) या संस्थेतर्फे केले आहे .
 
Top