पंढरपूर - एक लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या आणि तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर शहरात, दररोज येणाऱ्या लाखाहून अधिक भाविकांमुळे कायमच वर्दळ असते .याहूनही अधिक महत्त्वाची बाब म्हणजे येथील स्टेशनरोड परिसर कायमच वाहने आणि पायी चालणारे नागरिक यामुळे गर्दी मय असतो. या रोडवर आणि रोडनजीक अनेक नॅशनल बँका आणि नागरी बँकांनी आपली कार्यालये थाटली आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया , युनियन बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया , माढेश्वरी अर्बन बँक ,सांगोला अर्बन बँक, कॅनरा बँक ,मर्चंट बँक पंढरपूर यासह अनेक बँकांचा समावेश आहे. या बँकांमध्ये ग्राहकांची सतत वर्दळ असते. येथे येणाऱ्या ग्राहकांची  दुचाकी-चारचाकी वाहने भर रस्त्यावर लावली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात .प्रसंगी वादही उद्भवतात. वाहतुकीमध्ये बेशिस्तपणा येऊन प्रसंगी अपघातही होतात. यामुळे करोडोंच्या उलाढाली साठी आपली दुकाने थाटलेल्या या बँकांना त्यांची स्वतःची पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश होण्याची गरज आहे तसे न झाल्यास प्रसंगी कारवाई होण्याचीही गरज आहे. तरच पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत बेशिस्त निर्माण करणाऱ्या या गोष्टीस आळा बसणार आहे. पंढरपूर नगरपरिषदेने  बेशिस्त निर्माण करणाऱ्या या गोष्टीस वेळीच आळा घालण्यासाठी १५ दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या  वतीने, पंढरपूर नगरपरिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल असे निवेदन नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांना देण्यात आले
 या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास पंढरपूर नगरपरिषद प्रशासन ,सदर समस्या निर्माण करणाऱ्या बँका तसेच  संबंधित इमारतींचे मालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवबुध्दचे सोलापूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर डांगे, सागर कदम,संभाजी बिग्रेडचे किरणराज घाडगे, संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम,आकाश पवार, सुनिल आगवणे,अनंता पवार,वैभव निकम, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
 
Top