मुंबई : कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत हातात घड्याळ घेतले आहे.


राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आमदार भारत भालके आणि माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.भारत भालके हे दहा वर्षापासून  आमदार असलेले  तसेच सहकार क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व आहे. दौलत दरोडा हे शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.या दोघांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्वागत केले.
 
Top