अलिबाग,(गोरेगाव -सरफराज बेदरेकर)-    जिल्हा क्रीडाधिकारी अलिबाग यांच्यामार्फत माणगाव तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन आय.एन.टी.इंग्लिश स्कूल, वनीपुरार येथे करण्यात आले होते.यामध्ये माणगाव तालुक्यातील १४ ,१७, १९ वर्षाखालील मुले, मुली यांनी आपला सहभाग नोंदविला होता.१७ वर्षाखालील मुलांमध्ये हे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकाविला.तसेच १९ वर्षाखालील मुलांनीही द्वितीय क्रमांक पटकावला.     
   या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी व सर्व सदस्य तसेच उर्दू एज्युकेशन सोसायटी गोरेगावचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक मुनीर अहमद अल्लाबक्ष सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक सरफराज बेदरेकर , मोहसिन मूर्तूजा शेख व क्रीडा समितीचे सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
Top