सोलापूर:-  आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग ३७ व ३८ मधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळावा सत्यलक्ष्मी गोल्ड फंक्शन हॉल ,जुना वालचंद कॉलेज जवळ आयोजित केला होता.
यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यानी आ. प्रणिती शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्याचा संकल्प केला.

यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मी मतदार संघातील नागरिकांची गाठी भेटी चालू केले आहे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. रस्ते, दिवाबत्ती, पाणी, ड्रेनेज या मुलभुत सुविधेसह शहर मध्य मतदार संघातील निरोधारांना पेन्शन, निराधाराना डबे, उपचारासाठी,औषधासाठी मदत,शैक्षणिक,दाखले शिबीर,आरोग्य शिबीर, क्रीडासाठी सहकार्य तसेच नागरिकांच्या कुठलेही काम असो ते काम आजपर्यन्त केले आहे. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आंदोलनामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भाजप सेना सरकार मानसिक त्रास देत आहे. म्हणून येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकांसमोर हिमतीने आपण केलेले कामे सांगून जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे.निवडणूक आले म्हणून अनेक जण  गुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत अश्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावे. समोर कोणीही असो काम किया तो डरना क्या असे विचार यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
या संकल्प मेळाव्यास परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, अशोक मादगुंडी, आनंद कंदिकटला, जनार्दन येमुल, रमेश कणले, श्रीनिवास तोपुल, प्रभाकर सादुल, योगेश मार्गम, हेमंत लिंबोळे, हरिष कोम्पेल्ली, भिक्षपती परकीपंडला, परशुराम आनंदकर, श्रीनिवास बागा, बाळू चक्राल, लता गुंडला, उमेश कोळी, राज गंदुरे, शंकर देशमुख, नरेंश येलूर, जयंत रच्छा, बालाजी गरदास, श्रीनिवास परकीपंडला, रमेश दासरी, श्रीशैल कोळी, लक्षण पडूरे, दिनेश गोसकी, रमेश विडप, भैया धोत्रे, गोवर्धन सरगम, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top