पंढरपूर : आषाढी यात्रा २०१९ मध्ये महाराष्ट्र पोलीस यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स यांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे,पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तसेच पंढरपूर शहर पोलीस कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सचे पुणे विभागीय अधिकारी, व्हाईस प्रेसिडेंट, डेप्युटी रिजनल मॅनेजर शामलजी पांडा म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि लाईफ इन्शुरन्समधील कर्मचार्‍यांचे काम हे सहकार्याचे आणि काही प्रमाणात मिळते-जुळते असते. लोकांना त्यांचे काम करत असताना आर्थिक संरक्षण देण्याचे काम इन्शुरन्स सेक्टर करत असते. एस.बी.आय. या इन्शुरन्स कंपनीच्या ८२४ शाखा आहेत. जे ग्राहक आमच्याकडून फायनान्शिअल मार्गदर्शन घेतात त्यांना सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या संस्थेला २००७-०८ या वर्षी नं.१ ब्रँड कस्टमर ब्रँड इंटरसिटीफ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
   डॉ.सागर कवडे म्हणाले, एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्सने केलेला सन्मान हा आषाढी यात्रा कालावधीत चांगले काम करणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पाठीवर दिलेली थाप आहे.ही थाप आम्हाला नक्कीच पुढे असेच चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.पंढरपूरात काम करण्याचे एक महत्व आहे. येथे भाविकांच्या सेवेसाठी काम करत असताना काही उपाययोजना राबविण्याची गरज आहे. यासाठी पोलीस प्रशासन असेच चांगले काम करेल, याची ग्वाही डॉ. कवडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्सचे डिव्हीजनल मॅनेजर सुहास बेडककर,पंढरपूर ब्रँच मॅनेजर सज्जन चव्हाण यांच्यासह एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सचे अधिकारी,कर्मचारी, पोलीस अधिकारी,कर्मचारी,माईंडवेवचे रोहन कौशिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top