पंढरपूर - गुरुवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान येथील अहिल्या पुलावरून दूध वाहतूक करणारा टँकर चालकासह भीमा नदीच्या पात्रात वरून खाली पडला होता. पुणे व उजनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच भीमा नदीच्या पात्रात पाण्याची झपाट्याने वाढ होत होती. सदरची घटना घडल्याची माहिती महसूल व पोलिस प्रशासनास समजताच घटना घडली त्या ठिकाणी महसूल पोलिस प्रशासनाचे अधिकारी यांनी भीमा नदीच्या पात्रात पडल्यात टँकरचा आणि चालकाचा दुपारपर्यंत शोध घेतला, परंतु काहीच हाती लागले नाही .त्यामुळे पाणी ओसरल्यानंतरच शोध घेणे सोपे होईल त्याची पूर्वतयारी म्हणून महसूल प्रशासनाने पुणे येथील एनडीआरएफची २५ लोकांची टीम बोलावण्यात आली होती. 


भीमा नदीचे पाणी उतरल्यानंतर शेगाव दुमाला जवळील विष्णुपद बंधारा याठिकाणी मृतावस्थेत पुरुष जातीचे प्रेत असल्याचे शेगाव दुमाला ग्रामस्थांनी शेगाव दुमालाचे प्रभारी तलाठी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला.त्यांनी वरिष्ठ महसूल अधिकारी यांना घटनेसंदर्भात हकीकत सांगितली. महसूल व पोलीस प्रशासनाने एनडीआरएफच्या टीमला शेगाव दुमाला येथे पाठवले. तामिळनाडूचे टँकर मालक एस नंदकुमार यांनाही मयताची ओळख पटवण्यासाठी शेगाव दुमाला येथे घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी दुध टँकर ड्रायव्हर असल्याचे खात्रीलायक सांगितले .त्यावेळी ड्रायव्हरचे नाव त्यांनी एम सर्वानंद हे नाव असून त्याचे वय अंदाजे तीस वर्षे आहे त्याचे गाव तामिळनाडू येथील नामकरण गावचा असलेचे सांगितले. दूध टँकर काढण्यासाठी मोठे क्रेन मागवली असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले. 
मयत ड्रायव्हरचे येथील उपजिल्हा रुग्णालयमध्ये पोस्टमार्टम करून त्याच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात आले.
 
Top