अल्पभुधारक प्रयोगशील शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेकडे मागितली इच्छा मरणची परवानगी

अहमदनगर :- नेवासा खंडित झालेला वीज पूरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय,जिल्हा व तालुका प्रशासनासह सबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांचेकडे एकूण ८ वेळा मेल , रजिस्टर्ड पत्रव्यवहार ,प्रत्यक्ष ऑफिस फॉलोअप, विनंत्या करूनही अद्याप विजपुरठा कार्ययन्वित न झाल्याने अखेर हताश होवून नेवास बु येथील एक जेष्ठ प्रयोगशील शेतकरी कै. मनोहर निलकंठ कुटे पाटील यांच्या पत्नी शशिकला मनोहर कुटे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना महावितरण कार्यालयात जीवन संपवीनेस लेखी पत्र देवून परवानगी माागितली आहे.

      सदर महिलेने महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांचा निषेध म्हणून दि.२३/०९/२०१९ रोजी वा या आठवड्यात शासकीय कार्यालयात वास्तव्यास येणे,संबंधिताना साड़ी चोळी बांगडया आहेर भेट देणे,रास्ता रोको करुन निवेदन देणे, महावितरनच्या प्रतिकात्मंक पूतळयास चप्पल हार,जोड़े मारो प्रेत यात्रा काढ़ने, घंटानाद करने आदि आंदोलन करुन जाहिर निषेध करुन नाइलाजासत्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेकड़े आँक्टोबर अखेर महावितरण कार्यालयात जीवनयात्रा संपविनेस परवानगी मागितली आहे.
पतीने महावितरण अधिकारी यांची हुजरेगिरी न करता तीन वर्ष सनदशीर मार्गाने ग्राहक मंचच्या माध्यमातुन वीज मिळवली याचा राग बाळगून तर महावितरण अपनास त्रास देत नाही ना अशी शंका आता मनात येत आहे.

 यावरून सरकारने जनतेसाठी कितीही फ़ायदेशीर योजना आखूनही काही निर्धास्त मुजोर अधिकारी यांचे नाकर्ते व उदासीन धरणामुळे सरकारचे योजनेस हरताळ फ़ासत असल्याच्या प्रत्यय येतो.
असे मत शशिकला मनोहर कुटे यांनी व्यक्त केले आहे.  
 
Top