शिक्षक दिन विशेष 

देश विदेशात शेकडो विद्यार्थ्यांचा शिष्य परिवार 
केला जातोय संस्कार  सामाजिक, अध्यात्मिक, सांगितीक, साहित्यिक  परंपरेचा....
तरीही  विसर शासनाला
सोलापूर जिल्ह्याचा अभिमान 
आजही भारतीय शास्त्रीय संगीतात अशी परिस्थिती आहे की,उच्च विद्याप्राप्त कलाकार ग्रामीण भागात कार्य करित नाहीत व ते यास कधी तयारीही दाखवत नाहीत आणि यास तयारी दाखविलीच तर अर्थिक फायद्याची अपेक्षा खूप मोठी ठेवली जाते.
शहरी भागाचे आकर्षन,नवीन संधी,प्रसिद्धी व मोठा अर्थिक फायदा यामुळे मोठ्या  शहरांमध्येच सर्वाधिक कलाकार आज आपली कलासेवा देत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील इच्छुकांना  उच्चस्तरीय शिक्षणाची ईच्छा,तयारी व अर्थिक पाठबळ असतानाही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक ग्रामीण बाल कलाकार हे कलाकार होण्याचे राहुन जातात.
पण एक सामाजिक देण व वारकरी पंपरेचा अभिमान यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून खंडाळी ता.मोहोळ येथील कै. महादेव पाटील,  वै.स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव पाटील (नाना),पं.श्री. दादासाहेब पाटील व आजच्या पिढीतील श्री. अविनाश पाटील व श्री.विकास पाटील हा पाटील पिता-पुत्रांचा परिवार गेल्या ७० वर्षापासून पंढरपूरसह सोलापूर जिल्यातील विविध ग्रामीण भागात शेकडो कलाकार घडवित आहेत व हे पवित्र ज्ञानदानाचे कार्य अखंडित व निस्वार्थ चालत आहे.गोपाळराव पाटील यांनी पं.दत्तोपंत मंगळवेढेकर,पं.बापू आपेगावकर यासारख्या दिग्गज कलाकारांकडून पखवाज वादनाची विद्या प्राप्त केली.पुढे दादासाहेबांनी ही पखवाजाची विद्या नानांकडून घेतली व स्वत:ही पं.दत्तोपंत मंगळवेढेकरांकडे शिकले.पुढे सोलापूर येथील सुप्रसिद्ध तबला वादक पं.विठ्ठल क्षिरसागर, पं.भिमराव कनकधर व मोडनिंब (ता.माढा) येथील पं.अनंत साठे अशा दिग्गज गुणी गुरूंकडून तबला विद्या प्राप्त केली.दादांच्या तबला व पखवाज वादनाचा विशिष्ठ ठसा सर्वदूर प्रसिद्ध होत होता. अशातच औरंगाबाद आकाशवाणीचे एक नित्य तबला वादक म्हणून बोलावणे आले पण आपला वारकरी परिवार,शहरी भागात जाऊन पंख्या खाली बसून पैसे कमविन्यापेक्षा गावा गावातील मातीत राहणाऱ्या गरिबा घरची मुलं शिकव असा सल्ला नानांनी दिला व आयुष्यातील एक वेगळा प्रवास सुरु झाला.आपणास प्राप्त विद्या गरिब व गरजू विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी पंढरपुरातील श्रीसंत नामदेव महाराज मंदिरात मोफत तर अगदी देणार्याची इच्छा असेल तर नाममात्र शुल्क घेत संगीत शिक्षणाचे कार्य दादांनी चालू केले.याच तालमीत नागेश पंडित,धनंजय रोंगे,प्रताप चव्हाण, सतिश भोसले,दादा जवंजाळ,आमोल साळुंखे, हेमंत गडेकर,राधेशाम गडेकर,रचना कोठारी, रामदास पाटोळे,विनायक भडंगे,बालाजी कांबळे, धनंजय मोरे,रोहश शेटे,दादा नागणे,मनोज व्हरगर,विष्णु क्षिरसागर,चिकम्मा सांगोलकर, रोहित सुतार,आमोल जावीर,प्रसाद पारसे,पल्लवी पारसे, अशी जातीवंत कलाकार घडविले.त्यामूळे याच विद्यार्थ्यांनी दादांचे नाव विविध शहरीभागात, गावा गावात,घरा-घरात पोहचविले आणि तबला वादन कलेला एक अद्भुत रूप आले.
पुढे श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये ह.भ.प. गुरूवर्य बद्रीनाथ तनपुरे महाराजांनी स्वतंत्र खोल्या देऊन याकार्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.
दादासाहेबांनी १९७८ साली श्री.कलापिनी संगीत विद्यालयाची स्थापना केली.अनेक गावोगावी, घरोघरी जाऊन तबला वादन विद्या गरजूंना शिकविली.शेकडो विद्यार्थी घडू लागले.शास्त्रशुद्ध रूपाच्या संगीत विषयक परिक्षा देता याव्या यासाठी त्यांनी स्वतंत्र व काळजीपूर्वक  मार्गदर्शन सूरू केले.सोलापूर,पुणे,लातूर,कोल्हापूर,परांडा, बार्शी अशा शहरी भागात जाऊन मुलं परिक्षा देऊ लागली.पण शहरीभागातील परिक्षा केंद्रावर परिक्षांसाठी गरिब  विद्यार्थ्यांना खूप विविधांगी त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले असता त्वरीत त्यांनी मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांची संलग्नता प्राप्त केली व स्वतंत्र संलग्न परिक्षा केंद्र मिळविले.विद्यार्थ्यांना विविध कलाकारांची कला साधना ऐकता यावी यासाठी सोलापूर,मोडनिंब, पंढरपूर,इंदापूर अशा भागात संगीत महोत्सव चालू केले.तर कित्येक कलाकारांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना ग्रामीण भागातील या कलेच्या कार्याची माहिती दिली. व कौतुकाची थापही मिळविली. तसेच विविध संगीत महोत्सवात पद्मश्री उ.अल्लारखाँ, पद्मभुषण उ.झाकीर हुसेन,भारतरत्न पं.भिमसेन जोशी, पद्मश्री पं. राजन साजन मिश्रा, पं. व्यंकटेश कुमार,पं.कूमार बोस,पं.ब्रिजनारायण, पं.सुरेश तळवळकर,पं.राजाभाऊ देव,पं.राजा काळे,पं. सतिश व्यास,पं.सुहास व्यास,पं.जयतिर्थ मेऊंडी, पं.मोहनकुमार दरेकर, पं. प्रभुदेव सरदार, पं. गहेरवार सर, पं. राजेंद्र कुलकर्णी ,पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. हेमंत पेंडसे, पं. यादवराव फड,पं.श्रीनिवास जोशी,  पं. रामचंद्र देखणे, अशा कित्येक दिग्गजांना पाटील पिता पुत्रांनी तबला वादन साथसंगत दिली आहे.आज कलापिनी संगीत विद्यालय हि  धर्मादय आयुक्त  संस्था अधिनियम कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था आहे.  आजपर्यंत ४५०० विद्यार्थ्यांनी या विद्यालयात संगीत शिक्षण घेतलेले आहे. 
सामाजिक कार्य 
दादासाहेब पाटील:- हे खंडाळी गावचे पोलीस पाटील असून गेल्या ४० वर्षापासून गावातील वातावरण अतिशय उच्चस्तरीय  ठेवण्यात यशस्वी झाले आहेत, आजपर्यंत  विविध पोलीस अधिक्षक , पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. भारतातील कित्येक दिग्गजांना अतिशय समर्पक अशी साथसंगत करण्यात विशेष हातखंडा कायम आहे.अतिशय तात्विक व्यक्तीमत त्यामुळे रागीट स्वभाव पण तितकाच माणुसकीचा ,साधेपणा, व मनमिळावूपणा कित्येकांना भावलेला आहे. 
विकास पाटील :- विकास पाटील हे सिंहगड संस्थेत संगीत शिक्षक म्हणून गेल्या १० वर्षापासून कार्यरत आहेत. ५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी तबला कला शिकविण्याचा एक विक्रमच केला आहे. तसेच यांचे सामाजिक कार्य इतके व्यापक आहे की अनेक मंत्री, खासदार, अधिकारी व ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. २०१७ साली ज्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदाय सांभाळला अशा ३५ वारकर्यांना, २०१८ साली आयुष्यभर शिक्षणाचे कार्य करणार्या ४० शिक्षकांना तर २०१९ साली २२ वर्षे देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांना त्यांनी जीवनगौरव तर काहींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पंढरपुरातील पालवी संस्थेस वेळोवेळी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना संगीत कलेचे सादरीकरण ऐकविले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारी सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांसह तबला वादन सादरीकरण करून एक आदर्श निर्माण केला. त्यासोबतच वृक्षलागवड, ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, मोफत सर्वरोग निदान शिबिर, लोकजागृती, लोकसंगीत महोत्सव, ग्रामीण महोत्सव, भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सव, बाल महोत्सव इ विषयावर सर्वात मोठे कार्य केले आहे. तसेच गरिब विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देण्याचे कार्य गेली २० वर्षापासून चालू आहे. 
अविनाश पाटील :- संपूर्ण विश्वात सुप्रसिद्ध युवा तबला वादक व एक आदर्श तबला शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.  पुणे येथे सिटी इंटर नॅशनल स्कूल मध्ये संगीत शिक्षकाचे कार्य चालू. इयत्ता दहावीत शाळेत पहिला येऊन एक आदर्श विद्यार्थी म्हणून गावाने गौरव केला.पुढे इयत्ता १२ वी व बी.ए साठीही प्रथम क्रमांक मिळविला. पुणे विद्यापिठात तबला विषयातील एम.ए.पदवीसाठी सुवर्णपदकसह प्रथम क्रमांक मिळवून एक आदर्श परंपरा कायम ठेवली. 
  गोरगरिबांना मोफत संगीत शिक्षण देण्यासाठी दरवर्षी मोफत दहा दिवसीय शिबीर आयोजित करतात.अनेक गरजू कलाकारांना स्व खर्चातून व्यासपीठ मिळवून देतात.भारतातील भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वश्रेष्ठ कलाकार पद्मश्री पं. राजन साजन मिश्रा,पं.जयतिर्थ मेऊंडी, पं.देवकी पंडित,पं.रोनू मुजुमदार,पं.अतुल उपाध्य अशा कित्येक दिग्गजांना तबला वादनाची साथसंगत केली आहे. भारतासह दुबई, लंडन, स्वित्झलॅंड सारख्या शहरामध्ये तबला वादन कला सादर केली आहे.
दादांची पत्नी सौ. लता पाटील :- 
ह्या उत्तम गायिका असून गावात पंचमी, गौरी, दिवाळी, सप्ताह, या  सर्व प्रमुख  सणांना सर्व महिला ,मुली एकत्र करून त्यांना विविध गाणी शिकवत, गात अतिशय सुंदर वातावरणात गावात परंपरा सांभाळत आहेत. तसेच गावातील महिला भजनी मंडळाच्या त्या एक आधार म्हणून कार्य करित आहेत. त्यामुळे दादांच्या कार्यास एक खंबीर पाठिंबा व आधार मिळाला आहे. 
पूनम पाटील:-श्री. अविनाश पाटील यांच्या पत्नी सौ. पुनम पाटील ह्या हिंदी विषयाच्या तज्ञ शिक्षिका म्हणून कार्य करित आहेत.भाळवणी, रोपळे  येथील रयत शिक्षण संस्था, पुणे विद्यापीठ , भारती विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे त्यांना वेळोवेळी  मार्गदर्शनासाठी बोलविले जाते. तसेच पाटील परिवाराची सर्व परंपरा आदर्श स्वरूपात सांभाळित आहेत. 
प्रियंका पाटील :- इंग्रजी विषयात पदवीत्तर असून  भारतीय शास्त्रीय संगीतातील गायन केलेचे शिक्षण निरंतर चालू आहे.
     
          लेख - विजय काळे, पत्रकार
 
Top