पंढरपूर - युती होणार की नाही आणि झालीच तर पंढरपूर मंगळवेढ्याची जागा कोणाला मिळणार यावर परिचारक ,भालके, आवताडे व गोडसे यांचे भवितव्य अवलंबून आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कमी झालेला जनाधार पहाता काॅग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके काॅग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत . कार्यकर्त्यांच्या बैठकीत जनताच हाच माझा पक्ष असेल असे स्पष्ट करत काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले .पक्ष सोडण्याच्या वाटेवर असलेल्या भालकेंनी अजून कोणत्याही पक्षात प्रवेशाचा सिंग्नल दिला नसल्याने ते अपक्ष लढण्याची तयारीत आहेत असे वाटत आहे. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भारत भालके हे मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार भालके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील याचा निर्णय घेण्यात आलेला नाही कारण आमदार भालके हाच आपला पक्ष असेल असे म्हणत भालके घेईल त्या निर्णय सोबत आपण असल्याचं समर्थकांनी सांगितले आहे . तर आमदार भालके यांना काय निर्णय झाला याबाबत विचारले असता जनता सांगेल तोच माझा निर्णय आणि जनता ठरवेल तोच माझा पक्ष आहे असं म्हणत अद्याप आपण कोणत्या पक्षात जाणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे भालके काॅग्रेसचा हात सोडणार हे जवळपास निश्चत मानले जात आहे आमदार भालके यांनी जनता हाच माझा पक्ष म्हणत अपक्ष लढण्याची तयारी केल्याचे दिसते. गतवेळी शिवसेनेकडून लढणारे समाधान आवताडे यांनी अद्याप कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. 

सतत जनतेच्या संपर्कात असल्याने परिचारक व भालके गट भक्कम स्थितीमधे असून शिवसेने कडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे यांनी घरोघरी जाऊन प्रचाराचा धुराळा  उडवला आहे. समाधान आवताडे हे फक्त निवडणुकीच्या वेळेसच जनतेशी संपर्क साधत असल्याने त्यांना मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यल्प दिसत आहेे. 

  जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे या गेल्या अनेक दिवसांपासूनच जनतेच्या संपर्कात आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत जनतेच्या विविध प्रश्नावर आंदोलने केली आहेत. तसेच विविध कार्यक्रमाद्वारे लोकांच्या संपर्कात जात होम टू होम प्रचार केला आहे. यामुळे त्यांची जनतेतून चर्चा  चालू आहे. एक प्रबळ उमेदवार म्हणून गोडसे सध्या चर्चेत आहेत.

  परिचारक गटाकडून सध्या उमेदवाराची घोषणा केली नसली तरी देखील परिचारक हाच आमचा पक्ष म्हणणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे असतानाही परिचारकांना पंढरपूर विभागामधून मताधिक्य मिळवण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत कारण मागील निवडणुकीत पंढरपूर येथील मतदान  परिचारक गटाला कमी झाले आहे. 
विठ्ठल परिवारामधे फुट पडल्याने आमदार भालके यांना एकट्याला लढावे लागणार आहे. मात्र जनतेशी सतत असलेला थेट संपर्क आणि जनतेच्या प्रश्नावर आक्रमक भुमिका घेणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख ही आमदार भारत भालके यांची जमेची बाजू आहे. याचा फायदा त्यांना नक्किच मिळणार असल्याचे दिसते.

समाधान आवताडे गटाची स्थिती अत्यंत कठिण दिसत आहे कारण पाच वर्षातून निवडणुकीपुरता जनतेशी येत असलेला संपर्क व अत्यल्प समर्थक यामुळे आवताडे गट सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मैल दूर  असल्याचे दिसत आहे. यासोबतच पंढरपूरमधे नसलेले मतदारांचे समर्थन व परिचारक, भालके, शैलाताई गोडसे यांचा मंगळवेढा येथील वाढता प्रभाव या आवताडे गटासाठी काळजी करायल लावणार्या  गोष्टी आहेत.
 
Top