कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा , 


चारित्र्चक्रवर्ती१०८ आचार्य शांतीसागर महाराज अन


 एलाचार्य आचार्य १०८ विद्यानंद महाराज
आज महत्वपूर्ण संबंध ,आठवणींना उजाळा :

विलक्षण योगायोग !आज कर्मवीर अण्णांची जयंती!कर्मवीर अण्णांचा राष्ट्रीय स्तरावर जन्मशताब्दी सोहळा प .पू .एलाचार्य आचार्य१०८ श्री .विद्यानंद महाराज यांच्या पुढाकाराने  त्यांचेच उपस्थितीत सुभाष मैदान ,नवी दिल्ली येथे १८ सप्टेंबर १९८६ शुभारंभ करण्यात आला!लोकसभेचे अध्यक्ष श्री .बलराम जाखड हे प्रमुख पाहुणे होते !
आज योगायोग पहा "कर्मवीर अण्णांच्या जयंती दिनीच पूज्य एलाचार्य ,आचार्य १०८ श्री .विद्यानंद मुनींचे महानिर्वाण झाले !!
कै.अण्णांचे सख्खे पुतणे श्री.सुभाषअण्णा पाटील आज वय ८४ वर्ष ,कुपवाड (सांगली -मिरज) यांनी आज फोनवर माझ्याशी बोलताना  एक आठवण सांगितली .त्यांचे वय त्यावेळी ७ वर्ष होते .चारित्र्यचक्रवर्ती  आचार्य १०८ शांतीसागर महाराज यांचे प्रवचनासाठी कर्मवीर अण्णा मंडपात येऊन बसलेले होते. पूज्य महाराजांना हे समजलं .आचार्यांनी अण्णांना पुढे बोलावलं !उभं केलं .अन जाहीर केलं 'हेच उत्तम ,आदर्श श्रावक आहेत.हे खरं काम करत आहेत ,आयुष्य सार्थक करत आहेत"
अण्णांचा हा अविस्मरणीय व अनमोल गौरव सभेत टाळ्यांचा कडकडाट प्रचंड होता"
मी कै .अण्णांना निरा जि.पुणे येथे वयाच्या चौथ्या वर्षी १९५१-५२ मध्ये पाहिले !आचार्य शांतीसागर महाराजांचा संदर्भ होता .त्याच वेळी निरा येथे रयत द्वारे हायस्कुल स्थापन झाले. पुणेचे मेयर श्री .पोपटलाल शाह,निरेचे श्री .माणिकलाल आर शाह व प्रसिद्ध डॉक्टर श्री .संकपाळ (जत) हे सहभागी होते!!
आम्हांस भूषणावह आहे की आम्ही सर्व भावंडे याचं संस्थेत शिकलोत.म्हणूनच आम्हांवर उच्चतम्म संस्कार झाले आहेत!

आनंद कोठडीया, कृषीरत्न,वादळ, जेऊर,(से.रे)
ता .करमाळा जि .सोलापूर 
भ्रमणध्वनी:८६०५६३८१४९/९४०४६९२२००,

 
Top