राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त 

देशाची आध्यत्मिक नगरी पंढरपूर हे प्लास्टीक मुक्त व्हावे म्हणुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महाराष्ट्र स्वच्छ नागरी अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” या मोहिमे अंतर्गत एक वेळा वापर होणारे प्लास्टीक (सिंगल युज प्लास्टीक) बंद करणे विषयी व संपुर्ण महाराष्ट्रातुन या प्लास्टीकचे समुळ उच्चाटन करणे विषयी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या करीता नगरपरिषदेने दि.०१/१०/२०१९ ते दि.०३/१०/२०१९ या कालावधीत करावयाच्या उपक्रमाचा कृती आराखडा तयार केला असुन दि.०१ ऑक्टोबर २०१९ रोजी पंढरपूर नगरपरिषदेने संपुर्ण शहरामधील घरोघरीचा व व्यापारी बाजार पेठेतील प्लास्टीक संकलन करणे करीता स्वतंत्र प्लास्टीक संकलन वाहनाची व्यवस्था केलेली आहे. तरी शहरातील सर्व नागरीक व्यापार्यांनी या प्लास्टीक कचरा संकलन वाहनाकडे आपल्याकडील प्लास्टीक कचरा देऊन प्लास्टीक मुक्त महाराष्ट्राकरीता आपला सहयोग द्यावा.तसेच अशा वाहनाकडे आपले कडील प्लास्टीक कचरा न देता आल्यास नगरपरिषदेने कार्यालयाच्या आवारात नियोजीत केलेल्या प्लास्टीक संकलन केंद्राकडे आपला प्लास्टीक कचरा द्यावा.
दि.०२ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ८.०० वाजता प्रतिमेचे पुजन करुन स्वच्छतेची व प्लास्टीक मुक्तीची शपथ घेण्यात येणार असून त्यानंतर दोन तास शहरात श्रमदानाद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. या करीता सर्व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शहरातील स्वयंसेवी संस्था, बचत गट उपस्थित राहणार आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. 
 दि. ०३ ऑक्टोबर २०१९ रोजी नगरपरिषदेच्या संकलन केंद्राकडे नागरीकांनी जमा केलेल्या प्लास्टीकचे विलगीकरण करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच त्यानंतरही शहरामध्ये एक वेळा वापर होणारे प्लास्टीक  (सिंगल युज प्लास्टीक) कॅरी बॅग आढळुन आल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
 
Top