पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे (पिंपरी-चिंचवड) संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणारा अठरावा आशा भोसले पुरस्कार पार्श्‍वगायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना देण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
   चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम पार पडला.एक लाख ११ हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
    नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या नंतर अवधूत गुप्ते यांनी उपस्थितांसमोर “डिपाडी डिपांग” हे गीत सादर केले.
 
Top