अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक कै. आ.आण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आपल्या संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेस जिल्ह्यातून जवळ जवळ १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला . त्यामधून विजयी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच सांगली कोल्हापूरातील पूरग्रस्तांना विठ्ठल - रूक्मिणी मंदीर समितीने अतुलनीय केलेल्या मदतीबद्दल मंदीर समितीचा सत्कार तसेच पंढरपूरातील रिक्षा चालक संघटनेच्या वतीने पूरग्रस्ताना अन्नदान केले बाबत सत्कार समारंभ तसेच के. बी.पी. कॉलेज पंढरपूर ला स्वायत्त दर्जा ( अटोनॉमस ) मिळाले बद्दल प्राचार्य डॉ. अशोक भोइटे सर यांचा सन्मान समारंभ असा संयुक्त कार्यक्रम बुधवार , दि. २५-९-२०१९ रोजी सकाळी ९.०० वा. , तांबट धर्मशाळा , गांधी रोड पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजित केला आहे. 


तरी सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते ,नागरिकांनी समारंभाच्या ठिकाणी स. १०.०० वा. बहुसंख्येने जयंती सोहळा व सत्कार समारंभ उपस्थित रहावे.
असे आवाहन अर्जुनराव गजानन चव्हाण,सोलापूर जिल्हा अध्यक्ष ,अ.भा.मराठा महासंघ,पंढरपूर यांनी केले आहे.
 
Top