पंढरपूर - जनहित शेतकरी संघटना शेतकर्याच्या मागण्यांसाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे. 
१) दांळिब पिकांचे दुष्काळ अनुदान शेतकर्याच्या खात्यावर जमा करावे.
२) पुरग्रस्त भागात पंचनामे केलेल्या लाभार्थ्यांना शासनाची जाहीर झालेली मदत लवकरात लवकर मिळावी.
३) पूरग्रस्त शेतकर्याचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे
४) शेडनेट पाँलीहाऊस शेतकर्याचे कर्ज माफ करावे
५) पंचनामा झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्याना पीक वीमा मिळावा.
६) पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकर्याना लाभ मिळावा.
या वरील प्रमुख मागणी साठी दि.११-०९-२०१९ रोजी वार बुधवार सकाळी ११ वाजलेपासून उपोषणास सुरुवात केली जाईल.
 यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे,कौठाळीचे सरपंच महादेव गाढवे,रमेश लंगोटे ,आणा पवार,सुरेश नवले,माऊली भोसले, श्नीकांत नलवडे,व्यंकटरमण देशमुख,माळसा खांडेकर, दादा चव्हाण आदी उपस्थित होते.
 
Top