हॅन्डवाॅश स्टेशनचे भाविकांसाठी लोकार्पण 

सोलापूर - आषाढी यात्रेनिमित्त नव्याने ८ हॅन्डवाॅश स्टेशन पालखी सोहळ्यात दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिली. 

या हॅन्डवाॅश स्टेशनाचा शुभारंभ अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, व विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करणेत आला. 
या प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लीकार्जून पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  चंचल पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी  विजय लोंढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख प्रमुख उपस्थित होते.

*देशांतील पहिले मोबाईल हॅन्ड वाॅश स्टेशन*
*सोलापूर जिल्हा परिषदेचा नाविण्यपुर्ण उपक्रम*
 
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने हरीत वारी निर्मल वारी या उपक्रमा अंतर्गत देशांतील पहिले मोबाईल हॅन्ड वाॅश स्टेशन" तयार केले आहे
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षास डाॅ. राजेंद्र भारूड यांनी ही संकल्पना बोलून दाखवून दाखविली. त्याचे महत्व व डिझाईन  सांगितले त्यानुसार या गाड्या कमी खर्चात बनविले आहे. लहान वाहने १५ दिवसाचे कालावधी साठी भाडाने घेऊन हॅन्डवाॅश स्टेशन बनविणेत आली आहेत. एम एस क्रिएशनचे अमोल जगताप डिझाईन तयार केले आहे . ही व्हॅन बनविणेसाठी योगदान दिले आहे.  
 *या व्हॅनची वैशिष्टय*
 
 या वाहनावर सहा वाॅश बेसीन बसविणेत आली आहेत. हात धुणेसाठी १ हजार लिटरची टाकी बसविणेत आली आहे. हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून १ हजार लिटर क्षमतेची टाकी टाकाऊ पाणी साचविणेसाठी बसविणेत आली आहे.  या वाहनावर स्पिकर बसविणेत आला आहे. शौचालयाचा वापर करावा. हात स्वच्छ धुणेसाठी आवाहन करणेत आहे. व्हॅन ला चित्ररथ प्रमाणे सजविणेत आले आहे. हात स्वच्छ धुणेची पध्दत समजावून सांगणारी चित्रे देणेत आली आहे. यामुळे हात धुणेचे महत्व भाविकांचे लक्षात येते. सांडपाण्याचा उपयोग झाडांना पाणी घालणेसाठी करणेत येत आहे. त्यामुळे रस्त्यावर कुठे घाण होत नाही. 
यासाठी शंकर बंडगर, महादेव शिंदे, प्रशांत दबडे , मुकुंद आकुडे यांनी बनविणेसाठी प्रयत्न केले आहेत.
 
Top