आरक्षण दिले त्यामुळे सत्कारासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली 

पंढरपूर ,(दिनेश खंडेलवाल) - गेल्या अनेक वर्षा पासून निर्णयासाठी न्यायालयामध्ये लटकलेल्या मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडून मराठा समाजास आरक्षण मिळवून दिलेल्या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, सकल मराठा समाज विठ्ठल नगरीत करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात न  येण्याचा इशारा देणारा हाच समाज आषाढीतील महापूजेसाठी पंढरीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करून समाजाची खरी अस्मिता दाखवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
*मुख्यमंत्र्यांकडे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी होणार -
 कोणत्याही सामाजिक आंदोलनात आजपर्यंत न झालेली ३५३ आणि इतर गुन्हे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात दाखल करण्यात आले आहेत. आरक्षणाबाबत न्यायालयासमोर ठाम भूमिका घेणारे राज्य सरकारने खास करुन मुख्यमंत्र्यांनी आंदोलन प्रसंगी आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत ही भूमिका मराठा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येणार आहे.
पंढरपूरात श्रीविठ्ठलाच्या आषाढी सोहळा येत्या  १२ जुलै रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्यातील महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरात येत आहेत. मराठा समाजास आरक्षण दिल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. यासाठी आषाढी एकादशी दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितल्याचे मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. गेल्या आषाढी सोहळ्याच्या अगोदर निघालेल्या ५७ भव्य मोर्चांमुळे आंदोलन तीव्र बनले होते. आंदोलना दरम्यान आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय मंत्रिमंडळात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी महापूजेला वेळी कोर्टामध्ये लटकलेल्या मराठा आरक्षण मागणीसाठी राज्यभर वणवा पसरला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने छेडले गेलेले आंदोलन उग्र बनले होते. 

   मराठा समाजाने आजवरच्या इतिहासात कधीही वर्णभेद जातिभेद केला नाही. गेल्या आषाढी वारीत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात येऊ नये हा इशारा आरक्षण मागणीसाठी त्रस्त झालेल्या आंदोलकांचा होता. आता मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयासमोर पाठपुरावा करून मराठा समाजास आरक्षण मिळवून देणाऱ्या पंढरी नगरीत महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान मराठा समाज करणार आहे.
मराठा आरक्षण मिळाल्यानंतर यावर्षीच्या।     मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यानिमित्त आपली भूमिका मांडण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूरात पत्रकार परिषद घेण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्याची भूमिका मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेस सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मोहन अनपट, नागेश भोसले, दिपक वाडदेकर, किरण घाडगे, संदीप मुटकुळे, शेखर भोसले, श्रीकांत भोसले, अर्जुन चव्हाण, सुधीर धुमाळ, संतोष कवडे, किरण भोसले, जयवंत माने आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते.
 
Top