पंढरपूर - तिसंगी,सोनके ता. पंढरपूर येथिल बँक आँफ इंडिया शाखा सोनकेचे बँक मॕनेजरपदी प्रमोद पवार रूजू झाले आहेत .त्या निमित्ताने सोनकेत त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दत्तात्रेय हाके, सुधाकर खरात ,काशिलिंग नाथबाबा कोळेकर,पांडुरंग माने,गणेश पुजारी, अंकुश हुलगे,अजित कोळेकर आदिंनी त्यांचा सत्कार केला.
 सत्काराला उत्तर देताना बँक मॕनेजर प्रमोद पवार यांनी, गावकर्यांना बँकेच्यावतीने जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले.

यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top