GSTR ९ एक चक्रव्यूह
जीएसटी चे युद्ध सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळी युद्धनीती सरकारने चालवली ती म्हणजे कर वसूल करण्यासाठी GSTR-3B, विक्रीची माहिती मिळविण्यासाठी GSTR 1, ITC 04 ,Trans 1 ,Trans 2 इत्यादी. पण त्यातून सावरलेल्या सर्व व्यापारी ,सल्लागार आणि सीए यांना जीएसटी कायदा अजून एक महत्त्वाची युद्धनीती घेऊन आला आहे, ते म्हणजे GSTR 9.
GSTR 9 म्हणजे पूर्ण आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारांची संकलित माहिती देण्याचे विवरणपत्रक.GSTR 9 तसे तर खूप सोपे विवरणपत्र आहे. त्यात तुमच्या वर्षाची विक्री, खरेदी ,इनपुट एक्स क्रेडिट (ITC), GST भरल्याची बेरीज यांची सविस्तर मांडणी करणे अपेक्षित आहे.
पण GSTR 9 हे चक्रव्यूह तेव्हा झाले, जेव्हा GSTR 1 आणि GSTR-3B आपोआप जोडले गेले. GSTR 9 ची खरी परीक्षा म्हणजे याचे रिकन्सिलेशन (जुळवाजुळव).
हे विवरणपत्र तयार करण्यासाठी कमीत कमी ५ रिकन्सिलेशन तुम्हाला तयार करावी लागतील. त्याची माहिती पुढीलप्रमाणे
१) विक्री रिकन्सिलेशन
खाते पुस्तकाप्रमाणे वर्षाची विक्री. ***
(Sales as per books of account)
(-) GSTR-3B प्रमाणे दाखवलेली विक्री ***
फरक ***
(-) GSTR-3B प्रमाणे मागच्या वर्षीची पुढील वर्षात दाखवलेली विक्री
फरक ***
जर हा फरक 0 असेल तर चांगलंच आहे. जर हा फरक (+) असेल , तर तुम्हाला DRC 3 मध्ये विक्री दाखवून टॅक्स भरावा लागतो. जर हा फरक(-) असेल, तर तुम्ही जास्त झालेली विक्री पुढच्या वर्षी दाखवू शकता.( आगाऊ रकमेवरील जीएसटी .)
२) B2B विक्री रिकन्सिलेशन
GSTR 1. ***
(-) GSTR 3B. ***
फरक. ***
हे रिकन्सिलेशन विशेष करून होलसेल डीलर B2B विक्री वर अवलंबून आहे.
जर हा फरक 0 असेल तर चांगलंच आहे. जर हा फरक (+) असेल , तर तुम्हाला त्याचे विश्लेषण विक्रीकर अधिकाऱ्याला देण्यास लागू शकते. जर हा फरक(-) असेल, तर त्याचा त्रास पुढील व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे( B2B व्यापारी).
३) ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) रिकन्सिलेशन
खाते पुस्तकाप्रमाणे वर्षाचा ITC ***
(ITC as per books of account)
(-) GSTR-3B प्रमाणे दाखवलेला ITC ***
फरक ***
(-) GSTR-3B प्रमाणे मागच्या वर्षीचा पुढील वर्षात दाखवलेला ITC
फरक ***
जर हा फरक 0 असेल तर चांगलंच आहे. जर हा फरक (+) असेल , तर तुम्हाला शिल्लक ITC चे क्रेडिट मिळत नाही. जर हा फरक(-) असेल, तर तुम्हाला DRC 3 विवरणपत्र टॅक्स भरावा लागतो.
४) GSTR 2A रिकन्सिलेशन
खाते पुस्तकाप्रमाणे वर्षाचा ITC ***
(ITC as per books of account)
(-) GSTR 2A ***
फरक. ***
जर हा फरक 0 असेल तर चांगलंच आहे. जर हा फरक (+) असेल , तर ज्यांनी विक्री तुम्हास दाखवली नाही त्या व्यापाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेणे . तसेच पुढील बिलान बाबत सतत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जर हा फरक(-) असेल, तर तुम्हाला जो जीएसटी आपलं नाही त्याचे क्रेडिट घेऊ नये (not Availed) म्हणून दाखवणे.
५) या वर्षाचे पुढील वर्षात होणारे परिणाम रिकन्सिलेशन
मागच्या वर्षीची विक्री यावर्षी दाखवली (रिकन्सिलेशन एक प्रमाणे) ***
(-) मागच्या वर्षीचा ITC यावर्षी दाखवला (रिकन्सिलेशन तीन प्रमाणे)***
कर भरला/कर परतावा ****
रिकन्सिलेशन पाच हे पुढील वर्षातील GSTR 9 साठी सुद्धा आवश्यक आहे.
वरील रिकन्सिलेशन करताना सल्लागारास मदत करणे हे व्यापारी याचे दायित्व आहे. सध्यातरी GSTR 9 दाखल करण्याची मुदत 30 जून आहे. पण त्यातील क्लिष्ट मुद्द्यांमुळे मुदत वाढण्याची शक्यता आहे.
शेवटी "देश आपला आहे ,GST आपला आहे." म्हणून इतकेच म्हणेन "आलिया भोगासी असावे सादर".