राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तातावर विधानपरिषद सभागृहात चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या बोलताना म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या २२ शेतमालाला केंद्र सरकाराने २०% वाढवली आहे यामुळे शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आलेले दिसतील.

सरकारने शाश्वत विकासाचे उद्दिष्टे राबविण्यासाठी सरकारने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ग्लोबल वोर्मिंगमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.  शाश्वत विकासाचे १७ उद्दिष्टे आहेत, या सर्व उद्दिष्ट्यांवर काम करण्याची इच्छा आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे याचे स्वागत देखील केले. 

● सरकारने केंद्राच्या मदतीने नदी शुद्धीकरण्यासाठी 'जायका' सारखे प्रकल्प राबविले आहेत. 

● शिक्षण  क्षेत्रात देखील खूप चांगला परिणाम युती सरकारच्या काळात झाला असल्याचे शिक्षण विभागात काम करणाऱ्या 'असर' या संस्थेने या सरकारच्या कामाची दखल घेतली आहे.

● महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे कामे सुरू आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात दळणवळण आणि व्यापारासाठी याची मदत होत आहे. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत प्रयत्न चालवलेले आहेत. याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले. सातत्याने अष्टविनायक मार्गाबाबत आ.डॉ.गोऱ्हे पाठपुरावा करत आहेत. याबाबत सरकार काम करत असून सध्या हे काम प्रगतीपथावर असल्याने समाधान व्यक्त केले. या महामार्गांचा उपयोग शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळविण्यासाठी होऊ शकले अशी अपेक्षा व्यक्त केली.

● मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे सुधारण्यासाठी सरकारने तरतूद केली आहे. 

● छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, साहित्यिक पु.ल.देशपांडे, ग दि माडगूळकर, सुधीर फडके यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्यपालने चांगले संकेत दिले आहेत. त्याबद्दल आभार मानले आहेत.

● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.

● विदर्भ व महाराष्ट्रातील नझुल जमीन फ्री होल्ड करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

●शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांनी ज्या योजनांसाठी म्हणून ते राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, पर्यावरणाच्या योजना, शिक्षणाच्या योजना असतील यांच्याकडे पण सरकारने तरतूद केली आहे. याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी सरकारचे आभार मानले.

● विधी आणि न्याय विभागासाठी १४ कौटुंबिक न्यायालय, २४ जलदगती न्यायालय आणि १८अतिरिक्त न्यायालय केलेली आहेत. तसेच पायाभूत सुविधा न्यायालयांना मिळाव्यात चांगल्याप्रकारचा निधी खर्च केलेला असुन पुढील काळात २७४५ कोटी तरतूद केलेली आहे.

या भविष्यकाळातील तरतूदीबाबत आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top