जळगाव -केळी, मोसंबी ,पेरू,डाळींब, पाठोपाठ आता आंबा लागवड ,उत्पादन ,प्रक्रिया व निर्यात क्षेत्रात जैन इर्रीगेशन जळगाव हे कृषी क्रांतीत सर्वांच्या पुढे १०० मैल अग्रेसर आहेत "असे प्रतिपादन कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी जैन हिल येथे आंबा लागवड , विकास,व निर्यात संदर्भात कार्यान्वित संशोधन ,विस्तार,प्रक्रिया कामकाज अवलोकनानंतर केले आहे .


जैन इरिगेशनचे फलोत्पादन विभाग प्रमुख डॉ .अनिल डहाके व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जडे यांनी कार्यान्वित कामकाजाची माहिती दिली."कै. मोठे भाऊ अर्थात श्री.भवरलालजी जैन यांच्या स्वप्नांचे प्रत्यक्ष दर्शन घेताना माणूस मंत्रमुग्ध होतो "असे उदगारही कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी काढले 


डॉ .अनिल ढाके यांनी आंब्याच्या जाती,वेगवेगळे विकसित संकर ,गुणधर्म ,लागवडीत विकसित तंत्र,अन प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.


आनंद कोठडीया यांचे समवेत सौ.वर्षा कोठडीया, बळीराम जाधव(जेऊर) हे होते .

शेवट करताना कृषीरत्न आनंद कोठडीया म्हणाले, "आंबा पिकाद्वारे राज्यात कृषीक्रांतीचे नवे पर्व सुरू झाले असून त्याचे श्रेय जैन इर्रीगेशन कडेच जाते "

दिनांक ,१२ जून,२०१९,जैन हिल,जळगाव.....

 
Top