पंढरपूर - आज १७ जुन २०१९, पंढरपूर नगरपरिषद संचलीत लोकमान्य विद्यालयात व  प्राथमिक शाळा नं ८ व शाळा नं १५ मध्ये आज नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देउन स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना गणवेश व वह्यां देण्यात आले. सरस्वती मातेच्या प्रतीमेचे पुजन करुन प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्राथमिक शाळा क्रं ८, शाळा क्रं १४, शाळा क्रं १५ व लोकमान्य विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी एका व्यक्तीला खास मिकी मॉउस चा पोशाख परिधान करुन  विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या मुळे विद्यार्थांचा उत्साह वाढला व  विद्यार्थ्यांनी जल्लोश करत, नाचत, गात मिकी मॉउस चे स्वागत स्विकारले. शिक्षण समिती सदस्य नगरसेवक विवेक परदेशी यांच्या वतीने सदर उपक्रम राबवण्यात आला. तसेच सर्व वर्ग शिक्षकांनी आपापले वर्ग सजवुन उपस्थित विद्यार्थ्यांचे फुगे देऊन स्वागत करण्यात आले. 

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन नवीन वर्ष चांगले पार पडेल व विद्यार्थी चांगले आभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये नाव कमवतील असे सांगितले.
         
सदर प्रवेश उत्सवात नगराध्यक्षा साधनाताई भोसले,शिक्षण समिती सभापती भाग्यश्रीताई शिंदे, नगरसेवक विवेक परदेशी, विक्रम शिरसट, प्रशासन अधिकारी महेश पवार, रामचंद्र बोडरे, समाजसेवक सचीन शिंदे, पंढरपूर शहर पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, मुख्याध्यापक सदानंद डिंगरे,नानासाहेब नरळे, भाऊसाहेब गंगनमले आदि उपस्थित होते.
 
Top