सिंदखेड राजा (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी राधेश बादले पाटील पंढरपूर यांची निवड मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने सिंदखेड राजा (बुलढाणा) येथे जाहीर केली. तसेच टेंभुर्णी येथील योगेश बोबडे यांची राजश्री शाहू महाराज शिक्षण परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी तर अकलूज खंडाळी येथील बाळासाहेब पवार व इस्लामपूर ता. माळशिरस येथील ज्ञानेश्वर पवार यांची महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी, संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या राज्य संघटकपदी शिराळ टेंभुर्णी येथील नागनाथराव संदिपान महाडीक यांची तर संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सुर्याजी महाराज भोसले पुळुज पंढरपूर यांची, गणेश नीळ व जी.के. देशमुख सर यांची शिक्षण परिषदेच्या राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. 
   सदर निवडी केल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे सर , महासचिव मधुकर मेहकरे, सोमनाथ लडके, पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमबापू माने आदि मान्यवरांनी जाहिर केले.

    सदर निवडी प्रसंगी राज्यातून शेकडो इच्छुक कार्यकर्ते व सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रविंद्र पवार माळशिरस,  सदाशिव पवार, जीवन यादव, सोलापूर, सेवा निवृत्त फौजदार शाहुराजे दळवी अकलूज आदि मान्यवर उपस्थित होते.
 
Top