पुणे,(डॉ.अंकिता शहा)-दि.२३-०६-२०१९ रोजी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर शुभांगी योगीराज सुतार, राहणार -अनिकेत बिल्डिंग, दत्त मंदिरामागे ,महेश सोसायटी, बिबवेवाडी ,पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा अखिलेश सुतार हा महेश सोसायटी चौक येथे भाजी खरेदी करीत असताना त्यांचा हात सोडून कुठे निघून गेला आहे. त्याचा इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही अशी माहिती डॉक्टर शुभांगी सुतार यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांना कळविले असता पोलीस उपनिरीक्षक थोरात यांनी ताबडतोब पोलीस हवालदार घटनास्थळी जाऊन बिहारी मार्शल यांना घटनास्थळी बोलावून सदर मुलाचा मोबाईलमधील फोटो द्वारे शोध घेतला.हा शोध घेत असताना सदरचा मुलगा भारत ज्योती बस स्टॉप येथे रडत असल्याचे दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे अर्ध्या तासात दिले .
 सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, पोलिस हवालदार श्री.अलाटे, पोलीस नाईक श्री.पाटोळे, पोलीस शिपाई  श्री.डोळसे यांनी केली
मुलाचा 
 
Top