पंढरपूर - कौठाळी ता.पंढरपूर येथील जि.प.शाळा, गोडसे वस्ती येथे पंढरपूर पंचायत समितीचे  सभापती राजेंद्र पाटील यांची अचानक भेट दिली.यावेळी शालेय पोषण आहार, पटसंख्या, गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक वाटप,शौचालय,शाळा इमारत आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.आतापर्यंत राजेंद्र पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील २११ शाळेंना भेट देऊन त्याच्या अडचणी समजून घेतल्या.राजेंद्र पाटील हे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच सभापती आहेत की ज्यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेला जाऊन विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी संपर्क साधला.राजेंद्र पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
 या भेटीप्रसंगी प.महाराष्ट्राचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सागर गोडसे,जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन आटकळे,पंढरपूर  मार्केट कमिटीचे संचालक रघुनाथ गोडसे,कौठाळी चे माजी उपसंरपच बापू गोडसे,रणजित गोडसे, विजय गोडसे शाळेचे मुख्याध्यापक बाजारे गुरुजी पालक, विद्यार्थी आदि उपस्थित होते.
 
Top