औरंगाबादपासून काहीच अंतरावर लासूर येथे बजाज फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना आणि आमदार प्रशांत बंब यांनी एकत्र येऊन चारा छावणी प्रारंभ केली आणि दुष्काळात दिलासा देण्याचा स्तुत्य उपक्रम ते राबवित आहेत, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे भेट दिली.चारा छावणीमध्ये जिथं मुकी जनावरं आहेत, तेथे त्यांच्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत. हा ऋणानुबंध अनुभवणं सुद्धा, रखरखत्या उन्हात एक गारवा देणारा क्षण असतो असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यांनी शेतकर्‍यांसोबत संवाद साधला. 
 पावसाचे वेध आता शेतकर्‍यांना लागले आहेत. केरळात त्याच्या आगमनाची बातमी सर्वांना ही सुखावणारीच आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात काळी माती ही मातेसमान आहे त्यामुळे मातीपूजन सुद्धा त्यांनी यावेळी केले. शेतकर्‍यांना धान्याचे वाटप केले. 
मला आनंद आहे की, जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन विहिरी इत्यादी जलसंधारणांच्या कामांमुळे अगदी कापूस, सोयाबीन सारख्या पिकांची सुद्धा उत्पादकता आपल्याला वाढविता आली. दोन पावसातील खंडामुळे जे नुकसान व्हायचे, ते आपण टाळू शकलो असे व्टिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
Top