*गर्भपिशवी काढण्यासाठी आता जिल्हा  शल्य चिकित्सक यांची पूर्व परवानगी बंधनकारक असणार आरोग्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे...*    प्रतोद आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बीड जिल्ह्यातील अवैधरित्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन...


(विधानमंडळ दि. १८) बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्या बाबत शिवसेना प्रतोद आ.डॉ.नीलम गोऱ्हे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व इतर विधानपरिषदेच्या इतर सदस्यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. २५ ते ३० वयोगटातील महिला ऊसतोड कामगारांच्या गर्भपिशवी ह्या ऊसतोड कामगारांच्या मुकादमला फायदा व्हावा यासाठी हे या महिलांच्या गर्भपिशवी काढल्या आहेत का? हा प्रश्न गोऱ्हे यांनी उपस्थित केला. या महिला कामगारांना आरोग्याच्या दुष्परिणामांबाबत कोणते समुपदेशन करण्यात आले नाही.?  याबाबत आरोग्यमंत्री यांनी उत्तर देताना सांगितले की, तीन वर्षात ४६०५ गर्भपिशवी खाजगी ९९ रुग्णालयात काढल्या असल्याचे सांगितले. भविष्यात अवैधरित्या गर्भपिशवी काढणाऱ्या विरोधात कारवाईसाठी व शस्त्रक्रियेबाबत Standard Operating Procedure (SOP) तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर गर्भपिशवी काढण्यापूर्वी संबंधित सर्व खाजगी रुग्णालयांनी जिल्हा शल्य चिकित्सक वा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वा उपजिल्हा रुग्णालय यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांना दर्शनी भागात गर्भपिशवी काढण्याअगोदर माहिती तसेच सदर पिशवी व स्त्रीबीजकोष काढल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. AMOGS व FOGSI संघटने मार्फत राज्यातील सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांना गर्भपिशव्या काढून टाकण्याच्या अनावश्यक शस्त्रक्रिया करू नयेत अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत राज्यतरीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात महिला आमदार आणि आरोग्य सचिव यांचा समावेश असून ही समिती पुढील दोन महिन्यात अहवाल सादर करणार असल्याचे ना.गोऱ्हे यांनी सांगितले. या अतिगंभीर आणि संवेदनशील प्रश्नाला सहकार्य दिल्याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी सभागृहाचे आभार मानले.     यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,आ.सुरेश धस, आ.मनीषा कायंदे, आ.विद्या चव्हाण, आ.हेमंत टकले, आ.विनायक मेटे यांनी या चर्चेत भाग घेतला.

 
Top