पंढरपूर - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गुरुवार दि.४ जूलै २०१९ रोजी सोलापूर जिल्ह्या मोहोळ तालुक्यातील सारोळे (कोठारी मळा) येथील दौऱ्यानिमित्त त्या कार्यक्रमाच्या नियोजना साठी तसेच  शेतकरी पिक विमा मदत केंद्राचा आढावा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून  माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागामध्ये राबवण्यासाठी शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख ना.तानाजीराव सावंत जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पंढरपूर  येथे उद्या दि.सोमवार १ जूलै  रोजी पंढरपूर शासकीय विश्रामगृह  येथे दुपारी १२ वाजता सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्या  मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ .शैलाताई गोडसे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल वाघमारे व सचिन बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पंढरपूर विभागातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख,उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, शिवसेना प्रणित सर्व संघटनेचे आजी माजी सर्व पदाधिकार्यानी उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी राजे शिंदे,जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग यांनी केले आहे.
 
Top