मुंबई, -काँग्रेस पक्षाने उपसभापती पदावरील दावा सोडल्यानंतर आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांनी  उमेदवारी माघारी घेतल्यानंतर शिवसेना प्रतोद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची आज सोमवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यामुळे डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह सर्वच पक्षच्या सदश्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top