(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब
गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाज हा शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत होता परंतु मराठा समाज हा सामाजिक दृष्टीने मागासलेला नाही असे म्हणून आजपर्यंत या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते आजपर्यंतच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक आयोग स्थापन केले, अनेक समित्या स्थापन केल्या, परंतु काही ना काही कारण पुढे करत मराठा समाजातील वंचित घटकाला आरक्षणापासून मुकावे लागले होते .शिवसेना-भाजप युतीच्या सध्याच्या शासन कालावधीत मराठा समाजाने जवळपास ५८ मूक मोर्चे काढले , त्यानंतर ठोक मोर्चे काढले होते. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असेआरक्षण देण्यासाठी शासनाच्यावतीने ठोस सकारात्मक भूमिका घेतली जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असा शब्द देऊन ठाम भूमिका युती शासनाने घेतली होती. या आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयांमध्ये झालेल्या वेळोवेळीच्या सुनावणी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून युती शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे सकारात्मक भूमिका मांडली होती. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेल्या सर्व नेत्यांचे हार्दिक आभार मानत असतानाच हे आरक्षण मिळण्यासाठी युती शासनाने जे प्रयत्न केले त्यांचेसुद्धा मनःपूर्वक आभार मानते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ.शैला गोडसे यांनी केले आहे.
 
Top