पंढरपूर, दि.१३ :- - राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान  व कृषि विकास अभियान सन २०१९ अंतर्गत लाभार्थी शेतक-यांची सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी  सुरज पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान  व कृषि विकास अभियान सन २०१९ अंतर्गत  दिनांक २२ एप्रिल २०१९ पर्यंत विविध घटकाचें ऑनलाईनव्दारे एकूण४०३३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ट्रॅक्टर लाभार्थी शेतक-यांची  सोडत दिनांक १८ जून रोजी तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सोडत दिनांक १९ जून २०१९ रोजी होणार आहे.ही सोडत सकाळी ११.०० वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय पंढरपूर, येथील आत्मा सभागृहात होणार आहे. ही सोडत प्रवर्ग निहाय घेण्यात येणार असून,या सोडतीस संबधित शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुरज पाटील यांनी केले आहे.

 
Top