सोलापूर जिल्हातील सर्वच तहसील कार्यालयातील सेतुतील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवण्यात यावी कारण सोलापूर जिल्हातील शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थी तहसील कार्यालयात जातीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमेअर दाखला तसेच अनेक विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी येतात. रितसर प्रस्ताव सादर करूनही वेळेत हे दाखले सेतूत दिले जात नाहीत. सेतुतील कर्मचारी उद्धटपणा करत आहेत, सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित बोलले जात  नाही,त्यामुळे पालक व विद्यार्थीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागदपत्राची पुर्तता करूनही दाखले वेळेत मिळत नाहीत तसेच बाहेरचे एजंट व कर्मचारी यांच्या संगनमत असल्याने पालक व विद्यार्थीना अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली जाते. रीतसर वेळेत दाखले देण्याचे असताना एका दिवसात दाखले मोठी रक्कम घेऊन दिले जातात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील सर्वच सेतूची शासकीय  चौकशी करण्यात यावी आणि सर्वसामान्य गरीब पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी व त्यांना वेळेत दाखले देण्यात यावेत, अन्यथा आम्ही सोलापूर जिल्ह्य़ातील कोठल्याही तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन प्रांत कार्यालयाचे नायब तहसिलदार विजय जमादार यांना दिले.यावेळी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, जिल्हाध्यक्ष परमेश्वर डांगे, शहराध्यक्ष मंगेश क्षीरसागर, शिवक्रांतीचे कार्याध्यक्ष सोपान देशमुख, देवराज युवा मंचचे अध्यक्ष शहाजी शिंदे, विशाल शिंदे, आकाश पवार, आण्णासाहेब दांडगे, भैय्या लिगाडे, शिवबुध्दचे शहरकार्याध्यक्ष रविराज मुटकुळे, उपाध्यक्ष अजय गुंड, सागर कवडे आदिसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top