पंढरपूर,दि.१ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आ. भारत भालके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय ध्वजारोहण सोहळयास पं.स. सभापती राजेंद्र पाटील, प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,सहाय्यक उपनिंबधक एस.एम. तांदळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी आ. भारत भालके यांना पोलीस पथकांनी मानवंदना दिली.यावेळी स्वांतत्र्य सैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व  नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top