फोटो ओळ - श्रीराम स्पोर्ट्स मल्लखांब आखाड्यात श्लोक पाटील याला पुष्पगुच्छ देताना रायगड भूषण जयपाल पाटील, आखाड्याचे अध्यक्ष नरेंद्र राउत, प्रशिक्षक शिरीष नाईक व खेळाडू. (छाया-सुरेश खडपे)

अलिबाग,(जयपाल पाटील)- तालुक्यातील चौल येथील श्रीराम स्पोर्ट्स मल्लखांब ॲकॅडमीचा ९ वर्षांचा असलेला श्लोक अरुण पाटील याला त्याने मल्लखांबच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल नुकताच अखिल भारतीय आगरी समाज संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत पाटील यांनी जाहिर केल्याबद्दल सागमळा चौल येथील आखाड्यामध्ये रायगड भूषण तथा अलिबाग शाखेचे अध्यक्ष जयपाल पाटील यांनी अभिनंदन केले. 

श्लोकला वयाच्या ४ थ्या वर्षापासून मल्लखांबाची आवड निर्माण केली ती त्याचे काका समाजसेवक सुर्यकांत पाटील यांनी. त्याची मोठी बहिणही दोरीवरील मल्ल खांबात तरबेज आहे. वडील जेएसडब्ल्यू साळाव येथे कामाला असून आई वडील आणि पाटील कुटुंबियांनी त्याच्या आवडीला मदत केल्यामुळे त्याने तालुका, जिल्हा, राज्य आणि देशात आपले मल्लखांबवरील कौशल्य दाखविले. या छोट्या वयात त्याने पुणे येथील सैन्य वसाहतीत सैनिकांना आपली कला दाखवून मंत्रमुग्ध केले. 

   मल्लखांबासोबत तो दांडपट्टाही लिलया खेळत आहे. त्याच्या या पारंपारीक जुन्या खेळामुळे अलिबागचे नाव मल्लखांबाबत सर्वत्र घेतले जाते. त्याची ही कला शिरीष नाईक सरांच्या (प्रशिक्षक) जे रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सचिव आणि सुर्यकांत पाटलांची कन्या कबड्डी पट्टू पूजा पाटील यांच्यामुळे प्रगती झाल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याला राष्ट्रीय आगरी पुरस्कार जाहिर झाल्याने त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 


फोटो ओळ - श्रीराम स्पोर्ट्स मल्लखांब आखाड्यात श्लोक पाटील याला पुष्पगुच्छ देताना रायगड भूषण जयपाल पाटील, आखाड्याचे अध्यक्ष नरेंद्र राउत, प्रशिक्षक शिरीष नाईक व खेळाडू. (छाया-सुरेश खडपे)

 
Top