निरा उजवा कालवा ब्रांच तीन खालील फाटा क्रमांक डी सात, डी 3 ,डी 2 , डी एक या लाभक्षेत्रातील कोर्टी बोहाळी, उंबरगाव, तिसंगी, सोनके ,गादेगाव, पळशी , गार्डी , लोणारवाडी, गायगवान, खिलारवाडी, डोन मळा व तिसंगी - सोनके तलाव लाभक्षेत्रातील दहा गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवार दिनांक ३ मे २०१९ रोजी सकाळी नऊ पासून आपले शेतीस ,जनावरांना व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून एन आर बी सी कार्यालय, पंढरपूर येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे त्याला शेतकरी बंधूनी मोठा प्रतिसाद दिला. 

 

यावेळी लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत परिचारक, आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील ,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे , जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे देशमुख, अशोक पाटील, अरुण घोलप, चंद्रकांत देशमुख,शहाजी नलवडे ,सुधाकर खरात यांच्यासह लाभक्षेत्रातील गावातील लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उपोषणासाठी आंदोलनासाठी पाठिंबा दिला.

 
Top