पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ  नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष सौ.लतिका डोके, मुख्याधिकारी अभिजीत बापट, गटनेते गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी, नगरसेविका शकुंतला नडगिरे,सुप्रिया डांगे,नगरसेवक विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर,डी.राज.सर्वगोड,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 

या ध्वजारोहण कार्यक्रमास ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी कार्य केले.

 
Top