मुंबई - महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यात सक्रिय असणाऱ्या शिवशाही व्यापारी संघाने शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला आहे. आज दि. ०१ एप्रिल, २०१९ रोजी शिवसेना भवन येथे संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले आणि प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांना शिवसेना भवन येथे पत्र देऊन महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी याबाबत पाठपुरावा करून आजच्या बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी शिवसेना सचिव खा.अनिल देसाई व मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

या व्यापारी संघात अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांची यात संघटना आहे. शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमा तून व्यापारीवर्गाच्या व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी काम करणारी संघटना आहे. याप्रसंगी पुणे, संभाजीनगर, धाराशिव, नवी मुंबई, सातारा, रायगड जिल्ह्यातील शिवव्यापारी संघाचे गोरख पाटील, रविकिरण घटकार, नवनाथ जाधव, मारुती म्हस्के, दत्ता गिरी, सुनीता खंडाळकर, भाग्यश्री म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, दीपक कांबळे, गणेश पाडोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top