भारत फायनान्स सेल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या चोरीला गेलेल्या सतरा लाख वीस हजार रुपये यापैकी सोळा लाख वीस हजार रुपये परत मिळवून देण्याचे काम पंढरपूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले आहे . भारत फायनान्स लिमिटेड कंपनीची पंढरपूर येथे शाखा आहे .१७ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कंपनीच्या तिजोरीमध्ये जमा असलेले सतरा लाख वीस हजार रुपये ॲक्सिस बँकेत डिपॉझिट करतो व त्यानंतर रजिस्टर नोंद करून घेतो असे सांगून प्रवीण कुमार प्रेमनाथ शिंदे,( राहणार -प्लॉट नंबर 326 ,किर्ती नगर ,अक्कलकोट रोड ,सोलापूर -हल्ली, राहणार प्रल्हाद नगर ,पंढरपूर) व ज्ञानदेव छगन रोडगे (राहणार, आवे तालुका -पंढरपूर )यांनी तिजोरीमधील रक्कम तपासून घेतली. ती रक्कम ज्ञानदेव छगन रोडगे याने बँकेत भरणा करतो म्हणून घेऊन निघून गेला. मात्र रक्कम बँकेत भरणा न करता प्रवीण कुमार शिंदे यांना फोनवरून व्हाट्सअप करून रुपये बँकेत जमा केल्याचे सांगितले . त्यानंतर सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी फायनान्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य शाखा कार्यालयमधून सतरा लाख वीस हजार रुपये जमा न झाल्याबाबत बँक स्टेटमेंट आले यामुळे ज्ञानदेव छगन रोडगे याने वरील रक्कम ॲक्सिस बँक कॅश डिपॉझिट करतो म्हणून नेले रक्कम चोरून नेल्याची तक्रार २३ ऑक्टोंबर रोजी प्रवीण कुमार शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिली.


तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी तपास स.पो.फौ. हनुमंत देशमुख यांच्याकडे तपास दिला. ही कारवाई शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, स.पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,  स.पो.फौ. हनुमंत देशमुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे, पो. ना. दादासाहेब लोंढे ,पो. हे. स्वाती लोंढे, पो. ना. किशोर गायकवाड,पो. ना. सतीश चंदनशिवे , पो.ना. मच्छिंद्र राजगे ,पो. ना. इरफान शेख,पो.ना.शोएब पठाण,पो.ना.अभिजीत कांबळे, पो.ना. पो. कॉ. गणेश इंगोले ,पो. कॉ.आरती घुमरे यांनी केला आहे.
 
Top