जळगाव (प्रतिनिधी)
 -भाजप केंद्रीय समितीने देशातील जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी घोषित केली होती. पक्षाच्या प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेला पक्षाचा एबी फॉर्म नंतर जमा केला जाणार होता.  त्याप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यांचा एबी फॉर्म आज त्यांचे निवडणूक प्रतिनिधी योगेश कोलते यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे जमा केला आहे. एबी फॉर्म जमा नसल्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरु होती त्यावर अखेर आज पडदा पडला आहे.

जळगाव लोकसभेसाठी स्मिताताई वाघ यांचा देखील एबी फॉर्म जमा झाला आहे.

 
Top