पंढरपूर (दिनेश खंडेलवाल)-अपमान चघळायचा नसतो तो गिळायचा असतो ही शिकवण घरातील जेष्ठ सुधाकरपंत परिचारक यांनी दिली आहे .शंकरराव मोहिते पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर मोहिते-पाटील यांच्या घराण्यात जर जेष्ठ कोण असेल तर ते फक्त सुधाकरपंत परिचारक आहेत. राजकीय भाषणाला बगल देत मोहिते पाटील घराण्याची भूमिका पंढरपूर येथील मार्केट यार्डमध्ये झालेल्या भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निम्बाळकरांच्या प्रचार मेळाव्याप्रसंगी रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी मांडली.
काही कारणाने आलेल्या दुराव्याबद्दल बोलताना रणजीतसिंह मोहिते-पाटील  म्हणाले,विजयदादा आणि आम्ही जरी प्रत्यक्ष एकत्र नसलो तरी आमचे परिचारक कुटूंबावर अजूनही तेवढेच प्रेम आहे.जेवढे पूर्वी होते. मागे एकदा बोलताना तानाजी वाघमोडे यांनी देश किंवा राज्य पातळीवर न बोलता स्थानिक प्रश्नावर बिल अशी चिट्ठी पटवली होती त्यामुळे मी आता फक्त स्थानिक पातळीवरच बोलतो असे मिस्कीलीने सांगितले.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील,आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक भा.ज.पा नेते आणि कार्यकर्तेसह मतदार उपस्थित होते.

 
Top