पंढरपूर (दिनेश खंडेलवाल ) -शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयांमध्ये चार अल्पवयीन मुलींवर तेथील चार शिक्षकच  विनयभंगाचा प्रकार गेल्या पाच महिन्यापासून करत असल्याचे निर्भया पथकाच्या तपासात उघड झाले.
 निर्भया पथकातील महिला पोलिसांनी मूकबधिर शाळेतील मुलींना गुड टच, बॅड टच बाबत माहिती देऊन विचारले असता येथील शिक्षकांनी नको तिथे हात लावण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी  ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत एकटेपणात विनयभंग केल्याचे पुढे आले या प्रकारात शिक्षक ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जुन तुकाराम सातपुते, संतोष बाळासाहेब कुलाल ,सिद्धेश्वर शंकर वाघमोडे या नराधम शिक्षकांनी अल्पवयीन मूकबधिर मुलींच्या विकलांगतेचा गैरफायदा घेऊन लैंगिक छळाचे प्रकार करत विनयभंग केला. या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या शिक्षकांविरुद्ध महिला पोलीस मणेर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पीएसआय गजानन गजभारे ,पोलीस कॉन्स्टेबल भोसले, शिंदे पोलिस शबाना मणेर, मुडे यांनी वरील अत्याचाराचा प्रकार उघडकीस आणला. या कामगिरीमुळे निर्भया पथकाचे शहरातून कौतुक होत आहे.
 
Top